आज ईशान्य मुंबईत विविध ठिकाणी आमदार आशीष शेलार यांच्यासोबत नालेसफाई कामाचा पाहणी दौरा केला आणि नालेसफाई कामाचा आढावा घेतला. नालेसफाईवर कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊन देखील नालेसफाईचे काम पाहता सगळीकडे अत्यंत भयाण चित्र आहे, प्लास्टिक व कचऱ्यामुळे नाले तुंबले आहेत. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे व पावसाळ्यात पाणी साचून पूरजन्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नालेसफाई पाहणी दरम्यान तेथील रहिवाश्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे, भालचंद्र शिरसाट, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*