आज पश्चिम रेल्वे मुख्यालय, चर्चगेट येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जी यांच्या हस्ते विविध रेल्वे प्रवासी सुविधांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले ज्यात उपस्थित होतो. सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले जी, पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील जी, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी आणि भाजपचे आमदार आणि इतर सहकारी देखील याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी उपनगरीय रेल्वेसाठी तक्रार निवारण कक्ष, पुनर्निर्मित फरेरे रोड ओव्हर ब्रिज, मुंबई उपनगरीय विभागात इन्टीग्रेटेड सर्वेलंस सिस्टम, मुंबई सेंट्रल स्टेशनवर POD" कॉन्सेप्ट रिटायरिंग रूम, चर्चगेट येथील रेल्वे सार्वजनिक तक्रार कार्यालय या कामांचे उद्घाटन केले. त्याचप्रमाणे मुंबई उपनगरीय विभागात पादचारी पूल , एस्केलेटर्स व लिफ्ट्स, अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकांवर होम प्लॅटफॉर्म, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे कोच रेस्टॉरंट, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांवर वेटिंग हॉल(प्रतिक्षालय), बोरिवली, जीटीबी नगर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकांवर टॉयलेट ब्लॉक या कामांचे लोकार्पण करण्यात आले. *मनोज कोटक खासदार* Attended inauguration and dedication of various passenger amenities by LOP Vidhan Sabha Devendra Fadanvis ji and MoS Railways Raosaheb danve ji at Western Railway HQ,Churchgate. MoS Social Justice & Empowerment Ramdas Athawale ji , MoS Panchayati Raj Kapil Patil ji , LOP Vidhan Parishad Pravin Darekar ji and other BJP MLAs and colleagues were also present. Grievance Redressal Cell ( तक्रार निवारण कक्ष)for Suburban Railways inaugurated on this Occasion. *Manoj Kotak MP*