Today In my constituency inspected Nalesafai Work at Kanjur, Mankhurd Nala, Usha Nagar Nala at Bhandup, Boundary Nala, at Mulund, as well as Bombay Oxygen Nala at Nahur and Somaiya & Lakshmi Nagar Nala at Ghatkopar.

On this Occasion Reviewed the Nalesafai work and reprimanded BMC officials for not completing the work properly & Told them because of their inefficiency and negligence common man face difficulties every year.

Even after spending more than crores on Nalesafai every monsoon Mumbai suburbs get flooded and people have to suffer. Instructed the municipality officers to take measures as soon as possible so that the people do not have to suffer.

On this Occasion directed The BMC officials to Complete the pending work Nalesafai immediately. Similarly, during the Nalesfai inspection visit, interacted with the local residents and got to know about their problems.

On this occasion MLA Parag Shah, Corporator Prabhakar Shinde, Corporator Sarika pawar, Corporater Jagruti Patil, Corporater Shrinivas Tripathi, Corporater Sakshi Dalvi, Corporater Samita Kamble, Corporater Rajni keni, Corporater Vaishali Patil, Corporater Bhalchandra Shirsat, Corporater Prakash Gangadhare, BJP workers, and other office bearers were present. Manoj Kotak MP

आज माझ्या मतदारसंघातील कांजुर, मानखुर्द नाला, भांडुप येथील उषा नगर नाला, मुलुंड येथील बाउंड्री नाला, त्याचप्रमाणे नाहूर येथील बॉम्बे ऑक्सिजन नाला आणि घाटकोपर येथील सोमय्या नाला व लक्ष्मी नगर नाल्याची पाहणी केली.

या प्रसंगी नालेसफाई कामाचा आढावा घेतला आणि नालेसफाईचे काम नीट पूर्ण न केल्यामुळे अधिकाऱ्यांची कानउघडणी केली व त्यांनां सांगितले की त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि हलगर्जीपणामुळे सामान्य माणसाला दरवर्षी अडचणींचा सामना करावा लागतो. मुंबईत नालेसफाईवर कोट्यावधीहून अधिक खर्च करून देखील दरवर्षी मुंबई उपनगरात पाणी भरते आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. दर पावसाळ्यात अपुऱ्या नालेसफाई मुळे जनतेला जो त्रास सहन करावा लागतो तो होऊ नये यासाठी पालिकेला लवकरात लवकर उपाययोजना करण्याची सूचना दिली.

याप्रसंगी नालेसफाईचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे नालेसफाई पाहणी दौऱ्यादरम्यान तेथील रहिवाश्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

याप्रसंगी आमदार पराग शहा, नगरसेवक प्रभाकर शिंदे, नगरसेविका सारिका पवार, नगरसेविका जागृती पाटील, नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, नगरसेविका साक्षी दळवी, नगरसेविका समिता कांबळे, नगरसेविका रजनी केणी, नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट,भाजप कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार