Today inaugurated Drive in Vaccination Center at Police Ground Ghatkopar.

In these times, one way of doing service is getting vaccinated, under which we are expanding vaccination centers for the residents of North East Mumbai and drive-in vaccination is a part of that. Drive-in vaccinations allow people to get their vaccination by sitting in vehicle.

This drive-in vaccination center is open for senior citizens above 60 years of age and the divyangs, so it will benefit them and they will not have to stand in long queues for hours in the scorching heat.

This will enable instant vaccination and reduce congestion at vaccination centers and our workers will help those who do not have a vehicle.

On this occasion MLA Parag Shah, Corporator Bindu Trivedi, Corporator Bhalchandra Shirsat, Mumbai Secretary Pravin Chheda, NE District President Ashok Rai, BJP Karyakartas and other office bearers were present. Manoj Kotak MP

आज पोलिस ग्राउंड घाटकोपर येथे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले.

या काळात सेवेचा एक मार्ग म्हणजे लसीकरण करून घेणे, याअंतर्गत आम्ही ईशान्य मुंबईतील रहिवाश्यांसाठी लसीकरण केंद्रांचा विस्तार करीत आहोत आणि ड्राइव्ह-इन लसीकरण त्यातील एक भाग आहे. ड्राइव्ह-इन लसीकरणामुळे लोकांना वाहनात बसून स्वतःचे लसीकरण करून घेता येइल.

हे ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग जनांसाठी उघडण्यात आले आहे, त्यामुळे याचा फायदा त्यांना होईल आणि कडक उन्हात त्यांना बर्‍याच तास लांब रांगेत उभे रहावे लागणार नाही.

यामुळे झटपट लस मिळू शकेल आणि लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी होईल आणि ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांना आमचे कार्यकर्ते मदत करतील.

याप्रसंगी आमदार पराग शहा, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, मुंबई सचिव प्रवीण छेडा, ईशान्य पूर्व जिल्हाध्यक्ष अशोक राय,भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार