राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, स्वयंसेवी संस्थांनी चाळीपासून ते इमारतीपर्यंत प्रत्येक नागरिकाच्या दारात लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. यासंदर्भात आज दुपारी मनपा आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेतली. डोर स्टेप लसीकरण आणि ड्राईव्ह इन लसीकरण मोहीम हा अजेंडा होता.

आजची ही भेट फलदायी ठरली कारण आयुक्तांनी अशी माहिती दिली की आतापर्यंत मुंबई शहरातील १३२ रुग्णालयांनी यासंदर्भात संपर्क साधला आहे आणि यासंदर्भात महापालिकेची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहेत.

त्याचप्रमाणे या बैठकीत उत्तरपूर्व मुंबईतील लसीकरण प्रस्तावा संदर्भात ३ कलमी अजेंडा सादर केला

१) महापालिकेने स्वतः लसी ताबडतोब खरेदी कराव्यात. २) महापालिकेने प्रत्येक केंद्राला १००० लस द्याव्यात. ३) मुलुंड,भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, शिवाजीनगर उत्तर पूर्व परिसरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणे. मनोज कोटक खासदार

As the prevalence of corona was increasing in the state, NGOs approached us for ensuring vaccination at the doorstep of every citizen from chawl to society. In this regard, today afternoon met Municipal Commissioner Iqbal Chahal this afternoon. The main agenda of the meeting was door step vaccination and drive in vaccination.

Meeting was fruitful as Commissioner informed that so far 132 hospital across Mumbai city have approached and MCGM guidelines regarding this will be released soon.

Similarly In this meeting Submitted a 3 point agenda regarding the vaccination proposal in NE Mumbai.

1) MCGM should themselves purchase vaccines immediately. 2) MCGM Should give 1000 vaccines per centre. 3) Increase the number of vaccination centers in NE mumbai areas like mulund bhandup vikroli ghatkopar shivajinagar. Manoj Kotak MP