Under the guidance of Hon'ble Prime Minister Narendra Modi ji our Country already started largest Vaccination Drive.Today we opening a new Vaccination Center at ESIS Hospital, Mulund West.

During this visit interacted with elderly people who came for vaccination and also had discussion with the doctors & hospital staff who handling Vaccination drive.Also took note of all preparations for vaccination & gave instructions to Officials and wished them best for Successful Vaccination Programme.

Our efforts to provide an accessible, equitable and safe vaccination opportunity for all Mumbaikars.Vaccination can save lives, register yourself for vaccination (https://www.cowin.gov.in/home). With successful vaccination drive we will defeat Corona !!!

On this Occasion MLA Mihir Kotecha, Corporater Prabhakar Shinde, Corporater Prakash Gangadhare, Corporater Samita Kamble and BJP Karyakarta & other office bearers were present. #WorldslargestVaccination #CoronaVaccination Manoj Kotak MP

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. आज आम्ही मुलुंड वेस्टच्या ESISहॉस्पिटल येथे एक नवीन लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले.

या भेटी दरम्यान लसीकरणासाठी आलेल्या वृद्ध लोकांशी संवाद साधला आणि लसीकरण मोहीम हाताळणारे डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांशी चर्चा केली. तसेच लसीकरणाच्या सर्व तयारीची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि यशस्वी लसीकरण कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

सर्व मुंबईकरांना एक सुलभ, न्याय्य आणि सुरक्षित लसीकरणाची संधी उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. लसीकरण केल्याने लोकांचे प्राण वाचू शकतात, लसीकरणासाठी स्वतःची नोंदणी करा (https://www.cowin.gov.in/home). यशस्वी लसीकरण मोहिमेने आपण सगळे कोरोनाला पराभूत करू !!!

याप्रसंगी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेवक प्रभाकर शिंदे, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका समिता कांबळे आणि भाजपा कार्यकर्ता व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार