भारतीय जनता पार्टीच्या वतीने घाकोपर (प.) येथे मंडळ पदाधिकारी, शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख, महिला मोर्चा, युवा मोर्चा विजयी संकल्प बूथ संमेलन (कार्यकर्ता मेळावा) आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यकर्ता मेळावामध्ये उपस्थित राहून उपस्थितांना संबोधन केले. तसेच भाजपाला आणखीन भक्कम कशाप्रकारे करता येईल, नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांना विश्वास कशाप्रकारे संपादन करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री. आशिष शेलार, श्री. प्रकाश मेहता, श्री. राम कदम, श्री. प्रवीण छेडा, श्री. श्रीनिवास त्रिपाठी, श्री. नरेश चंद्राना आदी पदाधिकारी उपस्थित होते.