सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे या धोरणाला अनुसरून विक्रोळीतील सुर्यनगर येथील बजरंग बली जनसेवा संघ यांच्या वतीने १२ आसनी शौचालय व २ संरक्षण भिंती यांचा उदघाटन व भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळ्यास उदघाटक म्हणून उपस्थित राहून माझ्या हस्ते या नागरी सुविधांच्या कामांचे उदघाटन व भूमिपूजन यशस्वीरित्या आज पार पडले. तसेच उपस्थितांना स्वच्छतेचा संदेश देऊन इतरांनाही त्याबाबत जागरूक करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानीक रहिवासी आदी उपस्थित होते.